Breaking News : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! खात्यात थेट जमा होणार नुकसानभरपाई

By Pramod

Published on:

Follow Us
Farmer Nuksan Bharpai

Farmer Nuksan Bharpai : मार्च २०२६ मधील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ₹१६४.८३ कोटींची मदत मंजूर केली आहे. DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. नाशिक विभागाला सर्वाधिक निधी मिळाला असून अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यात मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान, फळबागांचे नुकसान आणि शेतीमालाची हानी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांसाठी तब्बल ₹१६४ कोटी ८३ लाख ४४ हजार रुपयांच्या मदतीला मंजुरी दिली आहे.

Government of Maharashtra कडून जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ही मदत DBT पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

DBT द्वारे थेट खात्यात पैसे जमा होणार

शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की :

  • लाभार्थ्यांना DBT पोर्टलद्वारे थेट निधी वितरीत करावा
  • बँकांनी ही रक्कम कर्जवसुलीसाठी वापरू नये
  • एका हंगामात एकदाच मदत दिली जाईल
  • दुबार मदत होणार नाही याची तहसीलदार आणि जिल्हाधिकारी दक्षता घेतील

यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार असून कोणत्याही मध्यस्थाशिवाय पैसे खात्यात जमा होतील.

कोणत्या विभागाला किती मदत?

जिल्हानिहाय नुकसानभरपाई निधी

विभागजिल्हाबाधित शेतकरीबाधित क्षेत्र (हेक्टर)मंजूर निधी (लाख रु.)
पुणेसांगली११५७१६७६.५६३३८.७५
पुणेपुणे८५०३४४०.३७६९३.३७
नागपूरनागपूर२५०४७१.४६२५.६२
नागपूरचंद्रपूर५४४४४०.५४७५.०२
कोकणसिंधुदुर्ग२२१५०.५२१२.७७
कोकणरत्नागिरी१२१४८.६६११.९६
संभाजीनगरधाराशिव३३७५१६४५.१४३३१.३६
संभाजीनगरजालना२८५७१४९८.३०२५२.९०
संभाजीनगरहिंगोली४७८२६०.०८४५.०३
नाशिकनाशिक६५७४६६५७६९.५१९३३८.४६
नाशिकधुळे३९२७५२०१२.१५५४७७.५०
नाशिकजळगाव३७९१११८२३२.०३३९९४.६०
नाशिकअहिल्यानगर२९६०२९४३९.३२२५२०.०९

नाशिक विभागाला सर्वाधिक मदत

या मदतीमध्ये सर्वाधिक निधी नाशिक विभागासाठी मंजूर करण्यात आला आहे. एकट्या नाशिक विभागाला ₹१४५७८ लाखांपेक्षा जास्त निधी देण्यात आला आहे. यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा दिलासा

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. राज्यातील तब्बल १ लाख ५७ हजारांपेक्षा जास्त शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

Related Post

Leave a Comment